महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कृषिरत्न अर्बनचे कार्य कौतुकास्पद- आ. डॉ.बाबासाहेब देशमुख
कृषीरत्न महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कृषिरत्न अर्बनचे कार्य कौतुकास्पद- आ. डॉ.बाबासाहेब देशमुख
कृषीरत्न महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या कृषीरत्न महिला अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीने अल्पावधीत विश्वासार्हतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. ही संस्था भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, २७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल हीच या बँकेची सर्वात उल्लेखनीय बाब आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरेश सुरवसे, त्यांचे सुपुत्र सुधीर व संदीप सुरवसे त्याचबरोबर चेअरमन कोमल सुरवसे, व्हॉइस चेअरमन साधना अनुसे व सर्व संचालक मंडळ बँकेच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या पुढील काळात या बँकेचा उत्कर्ष सातत्याने वाढत राहील असा विश्वास वाटतो. असे प्रतिपादन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.
कृषीरत्न महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा नगरसेवक इंजि. रमेश जाधव, फॅबटेक उद्योग समूहाचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, सूर्योदय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, डॉ. दत्तात्रय इंगोले, दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे, नगरसेविका अनिता केदार, शोभा फुले, वैशाली झपके, तनुजा एरंडे, तुकाराम भुसनर, सुरेश माळी, विष्णू देशमुख, अरविंद केदार, वैभव केदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे, उद्योगपती अमोल खरात, खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन भुसनर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश आप्पा माळी, वक्ते व कथाकार सुनील जवंजाळ, बबन गायकवाड, डॉ निरंजन केदार, पोपट केदार, दीपक बंदरे, रावसाहेब साळुंखे, सत्यवान घाटोळे, मनोज कदम, रमेश अनुसे, अमोल बोत्रे, संस्थेचे सल्लागार ॲड. विशालदीप बाबर, ॲड. गौरव चांडोले यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक सुरेश सुरवसे, संस्थेच्या चेअरमन कोमल सुरवसे, व्हा. चेअरमन साधना अनुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सोसायटीच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करत महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था बजावत असलेली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पारदर्शक कारभार, सभासदांचा वाढता विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे संस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय यशयाप्रसंगी त्यांनी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व सभासदांचे अभिनंदन करून सोसायटीच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कृषीरत्न महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या माध्यमातून समाजातल्या असंख्य गरजूंना सोबत घेऊन ही बँक अतिशय तळमळीने काम करीत आहे. सुरेश सुरवसे, सुधीर सुरवसे, संदीप सुरवसे व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून केवळ दोनच वर्षात बँकेचा उत्कर्ष समाजासमोर दिसत आहे. या बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. अशा उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बँक सातत्याने प्रयत्न करीत आहे. सभासदांच्या मनात बँकेबद्दल असलेला विश्वास, जिव्हाळा, आपुलकी यातूनच बँक व सभासदांचे नाते दृढ होत आहे. सुरवसे कुटुंबीयांचे बँकिंग क्षेत्रातील काम पाहता भविष्यात कृषिरत्न महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उत्कर्षाची योग्य उंची गाठेल असा विश्वास वाटतो असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रमुख वक्ते कवी सुनील जवंजाळ यांनी विविध प्रकारच्या उदाहरणातून सामाजिक वास्तवता उपस्थितांसमोर मांडली. तसेच काही कवितांच्या माध्यमातून उपस्थित त्यांना अंतर्मुखही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.सुधीर सुरवसे यांनी तर आभार संदीप सुरवसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषीरत्न महिला अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



