डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी): निरोगी समाज, सुदृढ युवा पिढी आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सांगोला डॉक्टर असोसिएशन व सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथून सुरू होऊन देशमुख वस्ती परत सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे समाप्त होणार आहे. राज्यभरातील धावपटू, युवक-युवती, विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच फिटनेसप्रेमी नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“धावा आरोग्यासाठी, धावा उज्ज्वल भविष्यासाठी” हा संदेश देत आयोजित करण्यात येणारी ही मॅरेथॉन केवळ स्पर्धा नसून निरोगी जीवनशैलीचा उत्सव ठरणार आहे. नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्ये समाजात रुजविण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था व उद्योजकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पॉन्सरशिप व बक्षीस सहकार्यासाठी संपर्क :
– डॉ. शिवराज भोसले 9423327304
– डॉ. संगीता पिसे – 9011410998
– डॉ. नेहा पाटील- 9665046636
– डॉ. वैभव जांगळे- 9921404095
– डॉ. निरंजन केदार- 9145124579
– डॉ. सचिन लिगाडे- 9420947087
– अमोल जमदाडे -9527061480
“एक पाऊल आरोग्याकडे… एक धाव निरोगी भारताकडे!”
सांगोल्यातील या भव्य आरोग्यदूत उपक्रमात सहभागी होऊन डॉक्टर्स डे साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



