सामाजिक

नगरसेवक सीए जुबेर मुजावर यांच्या पुढाकाराने सांगोल्यात ‘NCMC कार्ड’ नोंदणी शिबिर संपन्न

९२ महिलांसह अनेक नागरिकांनी घेतला लाभ

नगरसेवक सीए जुबेर मुजावर यांच्या पुढाकाराने सांगोल्यात ‘NCMC कार्ड’ नोंदणी शिबिर संपन्न

९२ महिलांसह अनेक नागरिकांनी घेतला लाभ

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक सीए जुबेर मुजावर मित्र परिवार यांच्या वतीने अलराईन नगर येथील सीए जुबेर मुजावर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार दि. ५ जून २०२६ रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत हे शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले.

सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी नगरसेवक जुबेर मुजावर नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळेच या शिबिराला सांगोलकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. विशेषतः महिला भगिनींसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले, ज्यामध्ये एकूण ९२ महिलांनी उपस्थित राहून आपले स्मार्ट कार्ड नोंदणीकृत करून घेतले.

सीए जुबेर मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना कोणताही त्रास न होता त्यांचे कार्ड सहज उपलब्ध झाले. सांगोल्यातील जनतेला डिजिटल प्रवासाची आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक सीए जुबेर मुजावर यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!