सामाजिक

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात ४४ हजार कुटुंबांना मिळणार केरोसिन..!

नऊ वर्षांनंतर रेशनवर केरोसिन मिळणार, १२ हजार लिटरचा कोटा निश्चित

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात ४४ हजार कुटुंबांना मिळणार केरोसिन..!

नऊ वर्षांनंतर रेशनवर केरोसिन मिळणार, १२ हजार लिटरचा कोटा निश्चित

सांगोला (प्रतिनिधी): आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचे पडसाद आता ग्रामीण भागात तीव्रतेने उमटू लागले आहेत. वाढती टंचाई, गॅस एजन्सींसमोर लागलेल्या लांबलचक रांगा आणि विस्कळीत पुरवठा या पार्श्वभूमीवर शासनाने तात्पुरता उपाय म्हणून केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नऊ वर्षानंतर एलपीजी (घरगुती गॅस) टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा रेशन दुकानातून रॉकेल वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.  सांगोला तालुक्यात प्राधान्य कुटुंबे आणि अंत्योदय योजनेतील सुमारे ४४ हजार ०८३ लाभार्थी शिधापत्रिका धारक आहेत. सांगोला तालुक्यासाठी केरोसिनचा सुमारे १२ हजार लिटरचा कोटा निश्चित झाला असून एका रेशनकार्डधारक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अमेरिका इराण आणि इस्त्रायल आखाती देशातील युद्धामुळे व्यवसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला असून घरगुती गॅससाठी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर शहरी भागात २५ दिवसा आणि ग्रामीण भागात ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. गॅस टंचाईच्या भीतीने ग्राहक कंपन्यांच्या गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यावसाविक गॅस पुरवठा बंद झाल्याने हॉटेल, ढाबे, चहा टपरी, वडापाव सेंटर व्यवसायिकांनी गॅसला पर्याय म्हणून चुली पेटवल्या आहेत तर चहा, टपरी, वडापाव सेंटर व्यवसायिकांनी स्टोव्ह चालू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात अशाचप्रकारे गॅस टंचाई राहिल्यास आपत्कालीन परिस्थितीत रेशन कार्ड धारकांना केरोसिन वाटप करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या आहेत.

दरम्यान काळाच्या ओघात शहरी व ग्रामीण भागात रॉकेलवर चालणारे स्टोव्ह कालबाह्य होत असताना पुन्हा रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्हाला चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्राधान्य कुटुंबे आणि अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेल्या एका रेशनकार्डधारक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन दिले जाणार आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून घरात स्टोव्ह आहे का ? केरोसिन वापरण्यासाठी कोणती उपकरणे आहेत याबात पुरवठा विभागाने सर्वेक्षण करून प्राधान्य कुटुंबातील, तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकडून ही माहिती संकलित केली जात आहे.

सांगोला तालुक्यात २ हजार ९९१ अंत्योदय शिधापत्रिकाधारक, ६ हजार ८१७ शुभ्र शिधापत्रिकाधारक, ४१ हजार ०९२ अन्नसुरक्षा पात्र केशरी शिधापत्रिकाधारक, २५ हजार ८२५ अपात्र केशरी शिधापत्रिका धारक अशी एकूण ७६ हजार ७२५ शिधापत्रिका धारक संख्या आहे. त्यापैकी प्राधान्य कुटुंबे म्हणजेच अन्नसुरक्षा पात्र केशरी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारक अशा ४४ हजार ०८३ लाभार्थी शिधापत्रिका धारकांसाठी केरोसिनचा कोटा निश्चित झाला असून एका रेशनकार्डधारक कुटुंबाला तीन लिटर केरोसिन दिले जाणार आहे.

 

गेल्या काही वर्षांत उज्ज्वला योजना आणि वाढत्या गॅस वापरामुळे रॉकेल पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आला होता. २० ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार, ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे, अशा रेशन कार्डधारकांना रॉकेल मिळणे बंद झाले होते. यानंतर, उज्ज्वला योजना आणि वाढत्या गॅस वापरामुळे बहुतांश ग्राहकांसाठी रॉकेलचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. साधारणपणे २०१६- २०२० दरम्यान बहुतेक ठिकाणी रेशनवर रॉकेल मिळणे बंद झाले. दरम्यान, नऊ वर्षानंतर एलपीजी (घरगुती गॅस) टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा रेशन दुकानातून रॉकेल वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!