सामाजिक

सूर्योदय अर्बनच्या स्थलांतर सोहळ्याचे येत्या रविवारी आयोजन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन 

सूर्योदय अर्बनच्या स्थलांतर सोहळ्याचे येत्या रविवारी आयोजन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन 

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका कार्यक्षेत्र घेऊन सुमारे नऊ वर्षांपासून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणारी सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या संस्थेचा स्थलांतर सोहळा रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सांगोला शहरातील वाढेगाव नाका परिसरामध्ये पाटील कॉम्प्लेक्स या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. महाराष्ट्राचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते या स्थलांतर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अद्ययावत फर्निचर, अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि पारदर्शी कारभार यामुळे ग्राहकांचा असलेला अतूट विश्वास जपत गेली अनेक वर्षांपासून ही संस्था उत्कृष्टपणे सेवा देत असून व्यावसायिक कर्ज, नोकरदारांसाठी कर्ज योजना , त्वरित सोनेतारण कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्जांसोबतच ग्राहकांसाठी वेगवेगळ्या साईज मधील लॉकर सुविधा देखील या संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला पंचायत समितीच्या सभापती पूनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, सहाय्यक निबंधक वैशाली साळवे, बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, बाळासाहेब काटकर, जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे, अतुल पवार, दादासाहेब लवटे, शोभा खटकाळे, संगीता मोटे, सिंधुताई आलदर, नगरपालिका पाणीपुरवठा सभापती वैशाली सावंत, बांधकाम सभापती माऊली तेली, आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, महिला बालकल्याण सभापती छाया मेटकरी, नगरसेवक इंजि. रमेश जाधव, जुबेर मुजावर, अरुण पाटील, प्रशांत धनवजीर, विवेक पाटील, गणेश बनकर, आशादेवी यावलकर आणि दिव्यांनी दौंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सूर्योदय ग्रुपचे प्रमुख असलेल्या अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली सूर्योदय महिला अर्बन ही संस्था सुमारे 17 शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध भागात कार्यरत असून सांगोला शहरातील महात्मा फुले चौकातील प्रशस्त इमारतीमध्ये उत्कृष्टपणे सेवा देत आहे. त्याच संस्थेच्या परिसरात कार्यरत असलेली सूर्योदय अर्बन ही संस्था स्वतंत्र जागेत स्थलांतरित होत असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, माजी चेअरमन जगन्नाथ भगत गुरुजी आणि व्हा. चेअरमन सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!