हिवरे (करमाळा) येथील शेतकऱ्याची कलिंगड शेतीत विक्रमी भरारी
ॲग्रीकॉसच्या उत्पादनांचा प्रभावी वापर; एकरी तब्बल ३० टन उत्पादन, ₹२४ प्रति किलो दराने विक्री

हिवरे (करमाळा) येथील शेतकऱ्याची कलिंगड शेतीत विक्रमी भरारी
ॲग्रीकॉसच्या उत्पादनांचा प्रभावी वापर; एकरी तब्बल ३० टन उत्पादन, ₹२४ प्रति किलो दराने विक्री
सांगोला (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील हिवरे येथील प्रगतशील शेतकरी विकास कामटे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व ॲग्रीकॉस कंपनीच्या कृषी उत्पादनांचा प्रभावी वापर करून कलिंगड शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. योग्य नियोजन, शास्त्रीय व्यवस्थापन आणि रोग–किड नियंत्रणातील काटेकोर उपाययोजनांमुळे त्यांच्या शेतात एकरी तब्बल ३० टन उत्पादन मिळाले असून २४ रुपये प्रति किलो दराने विक्री करत विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.
कलिंगड पिकामध्ये सुरुवातीपासूनच रोग व किडीचे शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण करण्यात आले. मर रोगावर नियंत्रणासाठी “विल्टनॉट”, करपा रोग नियंत्रणासाठी “शाडोफाईट”, तसेच थ्रिप्स किड नियंत्रणासाठी “रॉबिन ५५५” या उत्पादनांचा वापर करण्यात आला. यासोबतच फळधारणा व फळांची जोमदार वाढ होण्यासाठी “फुल सोना” या उत्पादनाचा वापर केल्यामुळे पिकाची वाढ निरोगी व सशक्त झाली. परिणामी मोठ्या प्रमाणात फळ सेटिंग होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
या सर्व उपाययोजनांमुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. कलिंगडाचा आकार, वजन आणि दर्जा सुधारल्याने बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला. उत्पादनातील सातत्य, दर्जेदार फळे आणि योग्य दर यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक लाभ झाला. कलिंगड काढणीपूर्वी शेतात पारंपरिक पद्धतीने पूजा करून उत्पादनाला शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी विकास कामटे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शेतात झालेल्या भरघोस उत्पादनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून अनेक शेतकरी प्रत्यक्ष शेतभेट देऊन माहिती घेत आहेत.
“योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि आधुनिक कृषी उत्पादनांचा शास्त्रीय वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते,” असे मत विकास कामटे यांनी व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे तालुक्यातील शेतकरी उत्पादनवाढीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.



