“हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”
लाडकी बहीण ते स्वयंरोजगारापर्यंत… महिलांच्या विश्वासातून चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित

“हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”
लाडकी बहीण ते स्वयंरोजगारापर्यंत… महिलांच्या विश्वासातून चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित

सांगोला प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटातील भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रचारार्थ सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सुजाताताई केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली चोपडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना महिलांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी सौ. सुजाताताई केदार सावंत यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अत्यंत आपुलकीने चर्चा केली. महिलांना सक्षम केल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही, हा महायुतीचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थसहाय्य, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुजाताताई केदार सावंत यांनी दिले. यासोबतच गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य, तसेच महिलांसाठीच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे पाहिले जात असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झालेला उत्साह, सहभाग आणि विजयी निर्धार पाहता, चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीच्या प्रचाराला महिलांची भक्कम साथ मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.



