महाराष्ट्र

भिगवणजवळ अपघातात सांगोल्यातील तिघांचा मृत्यू

सोलापूर महामार्गावर डाळज येथे भीषण अपघात, मृतांमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश, तीनजण जखमी

भिगवणजवळ अपघातात सांगोल्यातील तिघांचा मृत्यू

सोलापूर महामार्गावर डाळज येथे भीषण अपघात, मृतांमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश, तीनजण जखमी

सांगोला (प्रतिनिधी):  इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2 येथील सोलापूर–पुणे महामार्गावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.

या अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर–पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो (एम एच 13 सीयु 5163) याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला उभा केला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको (एम एच 12 एक्स ई 8816) या चारचाकी वाहनाच्या चालकाने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले. आदिती अमर हातेकर (वय २५), त्यांचा मुलगा जय (वय दोन वर्षे, रा. सांगोला) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६० वर्षे, रा. सांगोला) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मोटारचालक चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०), स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४, रा. पाटस) आणि समृद्धी कबीरदास गेजगे (वय १० महिने, रा. पाटस) हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!