राजकीय

जनतेच्या आग्रहास्तव जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार – डॉ परेश खंडागळे

जनतेचा विश्वास, विकासाची दिशा आणि प्रामाणिक कामगिरीतून उभारणार नवा आदर्श

जनतेच्या आग्रहास्तव जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार – डॉ परेश खंडागळे

जनतेचा विश्वास, विकासाची दिशा आणि प्रामाणिक कामगिरीतून उभारणार नवा आदर्श

सांगोला (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतडॉ.परेश खंडागळे यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची घोषणा करताच स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मागील पंचायत समिती निवडणुकीत जवळा पंचायत समिती गणातून प्रभावी लढत देत जनतेचा मोठा प्रतिसाद मिळवणाऱ्या डॉ.परेश खंडागळे यांनी पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

यावेळी बोलताना डॉ.परेश खंडागळे म्हणाले की, “मागील पंचायत समिती निवडणुकीत जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. गावपातळीवरील पाणी, रस्ते, शिक्षण, शेती या सर्वच विषयांवर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी काम केले. त्यामुळे या कामाचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा जनतेला प्रत्यय आला आहे. जनतेतूनच आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी होत आहे.”

स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असताना डॉ परेश खंडागळे यांनी निवडणूक प्रचाराची तयारी जोरात सुरू केली आहे. ग्रामपातळीवरील लोकसंपर्क, बैठका आणि जनसंवाद कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून, “जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहे,” असे डॉ परेश खंडागळे यांनी ठामपणे सांगितले. जवळा परिसरातील विकासाच्या दृष्टीने रस्ते, सिंचन, शैक्षणिक सुविधा, महिला बचत गटांची बळकटी, शेतकऱ्यांसाठी ठोस योजना या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या घोषणेमुळे हलचल निर्माण झाली असून, जवळा जिल्हा परिषद गटात ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून जवळा गटातील राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!