शहीद जवान संस्थेच्या रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्याचे रक्तदान

शहीद जवान संस्थेच्या रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्याचे रक्तदान
सांगोला (प्रतिनिधी): ध्यास जनसेवेचा या ब्रीद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान सामाजिक संस्थेच्या वतीने 26/11 दिन व संविधान दिनाच्या निमित्ताने सांगोला शहरातील नेहरू चौक येथे रतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीरपत्नी शितल वाघमोडे, विरपत्नी मंगल आदलिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, मेजर उत्तम चौगुले, संगिता चौगुले, मेजर निम्रगे, मेजर आनंद व्हटे, रमेश फुले, अरविंद केदार, शिवाजी इंगोले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, वसंतराव फुले इ. मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेले हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे असे अनेक अधिकारी शहीद झाले. त्यांच्या स्मृतिपित्यर्थ शहीद जवान संस्थेने रक्तदान शिबीर आयोजित करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली व संविधानाचे औचित्य साधून डाॅ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला बोलून सन्मान दिल्याबद्दल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. शहीद जवान संस्थेच्या पुढाकारामुळे बगीचा क्रमांक 47 चिंचोली रोड ,सांगोला येथे भव्य अमर स्तंभचे काम प्रगतीपथावर आहे असे सांगितले. अमर रहे अमर रहे, वीर जवान अमर रहे ,भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन शहीदांचे स्मरण करण्यात आले.
रक्तदान शिबिर प्रसंगी गजानन बनकर, सोमेश यावलकर, सुरेश माळी, सुरेश फुले, जय जीवन माजी सैनिक सेवा व संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मराळ, संतोष ऐवळे, विश्वजीत फुले, दत्तात्रय नवले, रावसाहेब गायकवाड, सिताराम महिमकर, प्रसाद फुले, महेश बनकर इ.पदाधिकारी यांनी भेटी देवून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव फुले व आभार प्रदर्शन बिरुदेव मासाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष महिमकर, महादेव दिवटे, आभिषेक फुले, आजित जाधव इ.पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



