सांगोल्यात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेतकऱ्याच्या 84 हजार 450 रुपयांच्या साहित्यावर डल्ला; चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत, इतर शेतकऱ्यांचे साहित्यही चोरल्याचा संशय

सांगोल्यात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेतकऱ्याच्या 84 हजार 450 रुपयांच्या साहित्यावर डल्ला; चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत, इतर शेतकऱ्यांचे साहित्यही चोरल्याचा संशय
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील सावे गावातील शेतकऱ्याच्या शेतातून ठिबक सिंचनाचे साहित्य चोरल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चोरीतील काही मुद्देमालही हस्तगत झाल्याने आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बिरा बाजीराव इमडे रा. सावे ता. सांगोला यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तात्या अर्जुन कोळेकर, विकास राजु शेळके, रितेश दत्तात्रय पाटील सर्व रा.सावे ता, सांगोला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिरा बाजीराव इमडे (वय 45, रा. सावे, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जून 2026 रोजी रात्री 11 ते 14 जून 2026 रोजी सकाळी 6 या दरम्यान सावे गावच्या शिवारातील गट क्रमांक 321 मधून तात्या अर्जुन कोळेकर, विकास राजू शेळके व रितेश दत्तात्रय पाटील (सर्व रा. सावे, ता. सांगोला) यांनी फिर्यादीच्या शेतातील ठिबक सिंचनाचे 16 बंडल, 3,000 ड्रिपर, टी, टेलपीस व एल्बो फिटिंग्ज असा एकूण 84 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तपासादरम्यान फिर्यादीच्या चोरीस गेलेल्या साहित्यापैकी ठिबक सिंचनाचे सहा बंडल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले असून, दत्तात्रय कारंडे यांचे ट्रॅक्टरवर चालणारे फवारणी यंत्र (ब्लोअर) देखील मिळून आले असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
याशिवाय, बाळासो जुदळे, बिरुदेव पाटील, बापूराव जुदळे, सतीश वाघमोडे, रेखा कुंभार, पोपट महादेव इमडे, संतोष सलगर व पांडुरंग वाघमोडे यांच्याही शेतीतील साहित्य चोरीस गेल्याची माहिती समोर आली असून, या सर्व घटनांचा संबंध एकाच टोळीशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी बिरा बाजीराव इमडे रा. सावे ता. सांगोला यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तात्या अर्जुन कोळेकर, विकास राजु शेळके, रितेश दत्तात्रय पाटील सर्व रा.सावे ता, सांगोला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनकर हे करीत असून, गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



