राजकीय

भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन कार्यशाळा उत्साहात संपन्न

भाजप सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन कार्यशाळा उत्साहात संपन्न 

सांगोला (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याच्या वतीने मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन अभियानाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन टेंभुर्णी येथे करण्यात आले. या कार्यशाळेस SIR प्रभारी, महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्याचे महामंत्री व आमदार भगवानदास सबनानी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन अभियानाचे महत्त्व, कार्यपद्धती, अंमलबजावणी आणि प्रत्येक बूथवर अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी बूथ सक्षमीकरण, संघटनात्मक बांधणी आणि मतदार यादी पुनरावलोकन अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेस भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, BLA 1, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आणि अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!