सांगोला बृहत विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम सुरवसे यांची निवड

सांगोला बृहत विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम सुरवसे यांची निवड
सांगोला (प्रतिनिधी): येथील सांगोला बृहत विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम साधू सुरवसे तर व्हा. चेअरमनपदी किशोर बाबुराव बनसोडे यांची निवड करण्यात आली.
सांगोला सांगोला बृहत विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी २४ जून रोजी निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी चेअरमनपदी श्री.शांताराम साधु सुरवसे तर व्हा.चेअरमनपदी श्री. किशोर बाबुराव बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गोसावी यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर नूतन चेअरमन व नूतन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक सुभाष कृष्णदेव पाटील (तानाजीकाका), सुकदेव आनंदा जांगळे, भारत गायकवाड, सुनिल पाटील, प्रभाकर घोंगडे, मंगल खाडे, शालन गयाळी, संतोष चौथे, सुभाष देशमुख, बाळू गावडे, वसंत सुपेकर, फिरोज खतीब, बजरंग (समाधान ) इंगोले, सुरेश डांगे, गुंडा चांडोले, सचिव एम.डी. गुळमिरे उपस्थित होते.



