सामाजिक

शहरातील 40 मुली व महिलांना एमएससीआयटीचे मोफत प्रशिक्षण मिळणार

सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम

शहरातील 40 मुली व महिलांना एमएससीआयटीचे मोफत प्रशिक्षण मिळणार

सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील 40 मुली व महिलांना एम.एस.सी.आय.टीचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठीच्या अंदाजित खर्चाला सांगोला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून लवकरच पहिली बॅच सुरू होणार असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती छाया मेटकरी यांनी दिली.

नगरविकास शासननिर्णयानुसार महिला व बालकल्याणसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवणेची तरतूद असून त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकीय रकमेतून 5 टक्के निधी म्हणजेच एकूण 12 लाख 13 हजार 730 रुपये इतका निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सांगोला शहर हद्दीतील मुलींना व महिलांना आपल्या पायावर उभे करुन व्यवसायिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी (एम.एस.सी.आय.टी, टॅली, टायपिंग, ड्रायव्हिंग इ.) प्रशिक्षण देवू शकतो. याच शासन निर्णयाच्या आधारे सांगोला शहर हद्दीतील इच्छुक व पात्र असणाज्या पहिल्या 40 मुली व महिलांची नाव नोंदणी करुन घेवून त्यांना एम.एस.सी.आय.टी चे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या एम.एस.सी.आय.टी मध्ये विद्यार्थ्यांना ए.आय. टेक्नॉलॉजी, एम.एस.ऑफिस बेसिक (वर्डपॅड, पॉवरपॉईंट, एक्सेल, आऊटलूक), इंटरनेट, वेब डिझाइनिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी अंदाजे खर्च होणारी रक्कम रू. 2 लाख एवढ्या खर्चास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून लवकरच एम.एस.सी.आय.टी च्या प्रशिक्षणाची पहिली बॅच सुरू होणार असल्याची माहिती छाया मेटकरी यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी 7972100365, 9503921500 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!