सामाजिक

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार

लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांचा संकल्प

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार

लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांचा संकल्प

सांगोला (प्रतिनिधी):  सांगोला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी ३ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसादिवशी सांगोला शहर व तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा संकल्प केला आहे.

मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलगा व मुलगी एकसमान मानावे या उदात्त हेतूने हा संकल्प त्यांनी सुरू केला आहे. सन २०१६ ते २०२५ या कालावधीमध्ये ३ ऑगस्ट रोजी वाढदिवसादिवशी जन्मलेल्या २२ मुलींच्या नावे एकूण ३,३०,०००/- रुपये ठेव ठेऊन सामाजिक उपक्रम व संकल्प पूर्ण केला आहे. ही रक्कम मुलीचे १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत तीन वेळा दामदुप्पट होऊन तिच्या पुढील शिक्षणास उपयोगी पडणार आहे. अथवा ही रक्कम तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या आई वडिलांना सुद्धा उपयोगी पडणार आहे.

तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे व समतोल रहावा, यासाठी वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सांगोला शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष आनंदा(भाऊ) माने यांनी दिली.

सांगोला शहर व तालुक्यामध्ये ३ ऑगस्ट २०२६ रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या पालकांनी डॉक्टरांचा जन्म दाखला किंवा घरी जन्म झाल्यास तशा प्रकारच्या पुराव्याची कागदपत्रे नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांच्या वंदे मातरम चौक येथील संपर्क कार्यालयात जमा करावीत, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!