सह्याद्री फार्मसीमधील महिला सक्षमीकरणासाठी रोजगारक्षमता व कौशल्य विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री फार्मसीमधील महिला सक्षमीकरणासाठी रोजगारक्षमता व कौशल्य विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेचे ऑफ फार्मसी, मेथवडे या महाविद्यालयात फार्मसी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या वैक्तिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात बी.फार्मसी व डी.फार्मसी अंतिम वर्षाच्या इच्छुक सत्तेचाळीस विद्यार्थिनीचे सात दिवसाच्या “महिला सक्षमीकरणासाठी रोजगारक्षमता व कौशल्य विकास ” या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख पाहुणे सौ.शिल्पा खुणे तज्ञ प्रशिक्षिका,नांदी फौंडेशन,पुणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, प्रा.एस.एस.काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले. हि कार्यशाळा महिंद्रा प्राईड कलासरूम अंतर्गत नांदी फौंडेशन,पुणे या संस्थेच्या तज्ञ प्रशिक्षिका सौ.शिल्पा खुणे यांनी घेतले.या सात दिवसाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत विविध उद्योग समूह व कंपन्यांमध्ये नौकरीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व त्यास कशा रीतीने सामोरे जावे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच, मुलाखत कौशल्य, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर, प्लेसमेंट स्किल, गटचर्चा, व्यवसाहिक नीतिशास्त्र, मौलिक कौशल्ये,प्रभावी सामाजिक माध्यमाद्वारे स्वतःस सादर करायचे कौशल्य,व्यवसाय शिष्टाचार,मुलाखतीचे प्रकार आणि कौशल्य, वैद्यकीय ज्ञान आणि निर्णय समर्थन प्रणाली, फार्मा कोअर क्षेत्रांचा परिचय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्रात्यकक्षिकासह उपस्थितीत विद्यार्थिनींना मॅडमनी दिली. सहभागी विद्यार्थिनींना उपस्थिती प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिबिराचे मुख्य समन्वयक प्रा.एस.एस.काळे, डॉ.एस.ए.माळी, प्रा.ए.आर.पवार यांचे योगदान लाभले.



