महाराष्ट्र

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर

सांगोला (प्रतिनिधी): विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता राज्य मार्ग ३८६ साठी ३४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य रस्त्यांच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सदरचा निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.
सदरचा रस्ता हा राज्य मार्ग क्रमांक ३८६ अंतर्गत दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी- सोनलवाडी- एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता पर्यंत असून या रस्त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. सध्या अनेक गावांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब असल्याने शेतमाल बाजारात नेणे कठीण होत होते. या विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून रोजगारात पण वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सदरचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!