गुन्हेगारी

सोनंद येथे जुगार अड्ड्यावर पंढरपूर पोलिसांचा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाची कारवाई, १५ जणांसह अनोळखी 5 ते 6 इसमांवर गुन्हा दाखल

सोनंद येथे जुगार अड्ड्यावर पंढरपूर पोलिसांचा छापा; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाची कारवाई, १५ जणांसह अनोळखी 5 ते 6 इसमांवर गुन्हा दाखल

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील सोनंद गावाच्या हद्दीत शेती गट क्रमांक १४८ मधील पडीक शेतजमिनीच्या परिसरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या अवैध जुगार अड्ड्यावर पंढरपूर अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख २२ हजार ४२० रुपये रोख रक्कम, १८ महागडे मोबाईल हॅन्डसेट, आठ मोटारसायकली, पाच चारचाकी वाहने तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर भंडरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बबन जगन्नाथ काशिद (रा. सोनंद ता. सांगोला, नितीन दादासो व्हरगर (रा. हटकर मंगेवाडी, संतोष जगन्नाथ मेटकरी (रा. जवळा ता. सांगोला), अविनाश बळीराम वसमाळे (रा. जत ता. जत जि. सांगली), प्रविण बंडु वाघमारे (रा. नाझरा ता. सांगोला), जगन्नाथ दादा कांबळे (रा. जत ता.जत जि. सांगली), समीर जाफर मुलाणी (रा. नाझरे ता. सांगोला), संतोष श्रीकांत लोहार (रा. नाझरा ता. सांगोला), श्रीकांत श्रीमंत तोडकर (रा. जवळा ता. सांगोला), राहुल शामराव कोडग (रा. औंढी ता.जत जि. सांगली), महेश राजाराम वायदंडे (रा. नाझरे ता. सांगोला), अमोल राजाराम विभुते (रा. नाझरा ता. सांगोला), सुकलेडू कांबळे (रा.कुंभार गल्ली सांगोला), अड्डा चालक धनाजी शिंदे रा. कुंभारी ता. जत जि. सांगली,अड्डा चालक नाना इंगोले (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अनोळखी 5 ते 6 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, मौजे सोनंद येथील गट क्रमांक १४८ मधील उत्तरेकडील बाजूच्या पडीक शेतजमिनीतील झुडपांमध्ये ५२ पत्त्यांवर तिरट नावाचा अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानंतर पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या सूचनेनुसार पंढरपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोसई युवराज पाटील, पोना चव्हाण, पोकॉ हुलजंती, पोकॉ खंडेराव कोरे, पोकॉ केशव चव्हाण, पोकॉ सचिन पवार, पोकॉ सदाशिव चिपडे व पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर भंडरवाड यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही जण गोलाकार टेबलाभोवती खुर्च्यांवर बसले होते, तर काही जण जमिनीवर बसून जुगार खेळत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांना पाहताच काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी १३ जणांना जागीच पकडले, तर अन्य ५ ते ६ अनोळखी इसम झुडपांचा आडोसा घेत पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी बबन जगन्नाथ काशिद (सोनंद), नितीन दादासो व्हरगर (हटकर मंगेवाडी), संतोष जगन्नाथ मेटकरी (जवळा), अविनाश बळीराम वसमाळे (जत), प्रविण बंडु वाघमारे (नाझरा), जगन्नाथ दादा कांबळे (जत), समीर जाफर मुलाणी (नाझरे), संतोष श्रीकांत लोहार (नाझरा), श्रीकांत श्रीमंत तोडकर (जवळा), राहुल शामराव कोडग (औंढी), महेश राजाराम वायदंडे (नाझरे), अमोल राजाराम विभुते (नाझरा) आणि सुकलेडू पकांबळे (कुंभार गल्ली, सांगोला) यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख २२ हजार ४२० रुपये रोख रक्कम, १८ महागडे मोबाईल हॅन्डसेट, आठ मोटारसायकली, पाच चारचाकी वाहने तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जुगाराचा अड्डा कोण चालवितो, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने धनाजी शिंदे (रा. कुंभारी, ता. जत, जि. सांगली) आणि नाना इंगोले (पूर्ण नाव माहित नाही, रा. सांगोला) यांच्यासह आणखी ५ ते ६ अनोळखी इसम जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर भंडरवाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!