सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी प्रवेशासाठी मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी प्रवेशासाठी मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
ऑनलाईन अर्ज ३० जून ते जुलै दरम्यान स्वीकारले जाणार
सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे येथे प्रथमवर्ष पदविका/डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले व संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी दिली.
या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता डी.फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे गुणपत्रके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रिया या बद्दल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदविका (डी.फार्मसी) प्रथम वर्ष प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक ३० जून ते १५ जुलै दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. तात्पुरती मेरिट लिस्ट १७ जुलै रोजी तर अंतिम मेरिट लिस्ट २१ जुलै रोजी आहे.
बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज / रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://phd26.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चिती होणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत मोफत सखोल मार्गदर्शन या महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे.तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ.ए.एम.तांबोळी (९९७५४०२४६५), प्रा.सुरज मणेरी (८००७२२१०८७) व प्रकाश पाटील (९८८१४३३६५८) पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१) यांच्याशी संपर्क साधावा.



