तरुणाईचा वाढता उत्साह, सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी
प्रभाग क्रमांक 11 मधून उन्मेष खंडागळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक 11 मधून उन्मेष खंडागळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
तरुणाईचा वाढता उत्साह, सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी
सांगोला (प्रतिनिधी): राजकीय घराणेशाहीचा कणभरही आधार नसताना, केवळ सामाजिक कार्याच्या जोरावर प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उन्मेष खंडागळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा अशी साधी पार्श्वभूमी; पण काम करण्याची तळमळ, लोकांपर्यंत पोहोचण्याची वृत्ती आणि समस्यांचे समाधान शोधण्याची धडपड यावर त्यांनी जनतेचा भक्कम विश्वास मिळवला आहे.
स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि सार्वजनिक सेवेसाठी सातत्याने धावपळ करणाऱ्या खंडागळे बंधूंच्या कार्यशैलीने प्रभागातील तरुणाई आणि नागरिक प्रभावित झाले आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सोयी-सुविधा अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी घेतलेले पुढाकार उल्लेखनीय ठरले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. उन्मेष खंडागळे यांनी व्यूहरचना, संपर्क मोहिमा आणि नागरिकांशी थेट संवाद यातून प्रचाराला वेग दिला असून, तरुण वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहे. “काम करणारा, नेहमी उपलब्ध असलेला आणि प्रभागाच्या विकासाबद्दल कटिबद्ध असलेला चेहरा म्हणजे उन्मेष खंडागळे” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक 11 मधून मिळालेल्या जनआग्रहानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरताच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विश्वास, सेवा आणि विकासाचा मार्ग स्वीकारत त्यांनी या निवडणुकीत दमदार लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



