राजकीय

सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा कोळ्यातील जुगार अड्ड्यावर छापा

४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा कोळ्यातील जुगार अड्ड्यावर छापा

४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला (प्रतिनिधी): सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने कोळा ता. सांगोला येथील अंकुश आलदर यांच्या शेतात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराचा अड्डा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३७ मोबाईल, १४ दुचाकी, ११ चारचाकी वाहनांसह रोख रक्कम असा १ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे या जुगार अड्ड्याची सांगोला पोलिसांना खबर कशी काय मिळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याप्रकरणी पंढरपूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजू महालिंग माळी रा. चिंचमळा, कोळा ता. सांगोला, अक्षय दिलीप भिंगारदेवे रा. नेहरुनगर, विटा ता. खानापूर, अंकुश रघुनाथ जरग रा. यतगाव ता. कडेगाव जि. सांगली, सुरजकुमार अजय राम रा. ब्रिंदावन जि.शेखपूरा बिहार, रोहित जयपाल मोरे रा. घुमटमळा, विटा ता.खानापूर, आगतराव संपत्ती माने रा. रुपनगरवाडी, नागज ता. कवठेमहाकाळ, सुरेश बाळू काटे रा. टेमलाईवाडी, उजगाव ता. करवीर, सचिन प्रल्हाद पवार रा. शिवणी ता. कडेगाव जि.सांगली, अभिषेक अशोक सरगर रा. करांडेवस्ती, करगणी ता. आटपाडी, अशोक कोंडिबा सरगर रा. करांडेवस्ती, करगणी ता. आटपाडी, नितिन रघुनाथ अनुसे रा.झरे ता. आटपाडी, सुरेश अप्पू नाईक रा.ओंकार आपार्टमेंट, डोबिवली, लक्ष्मण विलास पवार रा. गणेश मंदिर जवळ, चितळे ता. खटाव, संतोष गुंडा मंडले रा. बनपुरी रोड, करगणी ता. आटपाडी, शशिकांत सदाशिव खाडे रा. पळशी ता. माण जि.सातारा, दादासो बाळू नरळे रा. जुनोनी ता. सांगोला, सुनिलकुमार उत्तीमचंद पंडीत रा. कोरियाडी ता. डुंगरी जि. गिरडी राज्य झारखंड, अंकुश आनंदा आलदर रा. कोळा ता. सांगोला, बबलू तिलकचंद पंडीत रा. कोरियाडी ता. डुंगरी जि. गिरडी राज्य झारखंड, सिध्दनाथ पांडूरंग गायकवाड रा. बलवडी ता. खानापूर जि.सांगली, राहूल केशव सासणे रा.भैरवनाथ मंदिर, चितळी ता. खटाव जि. सातारा, विकास कुमार मदन रावत रा. बुधवली ता. नवादा जि. नवादा, सचिन लक्ष्मण गायकवाड रा. चितळी ता. खटाव जि. सातारा, अर्जुन दादासो गवंड रा. लोणारखोरी, आटपाडी जि. सांगली, बिरुदेव विठठ्ल टोणे रा.टोणे वस्ती, करगणी ता. आटपाडी जि. सांगली, प्रशांत गजानन घेवारी रा. महादेव मंदिर जवळ, आतनुर ता. तासगाव, रामचंद्र उत्तम थोरात रा. थारोत वस्ती, रामनगर ता. खानापूर, तानाजी हिंदूराव मंडले रा. पेडरस्ता, हातनुर ता. तासगाव जि. सांगली, कैलास किसन माने रा. झरे ता. आटपाडी, अरविंद सदाशिव स्वामी रा. जत रोड, ढालगाव ता. कवठेमहाकाळ, संजय आनंदा गडदे रा.बाज गाव ता.जत जि. सांगली, प्रकाश कृष्णा गोलगिरी रा. आतनुर ता. तासगाव, चंद्रकांत राजाराम पावणे रा. विभुतवाडी, ता. आटपाडी जि. सांगली, विकास प्रकाश बंडगर रा.जत जि.सांगली, कृष्णा रावसाहेब घोरपडे रा. शिवनी ता. कडेगाव जि. सांगली, जयप्रकाश शंकर खुबीकर रा.उचगाव जि. कोल्हापूर, दगडू नारायण गोडसे रा.सोलापूर, अजित पाटोळे रा. मायनी ता. खटाव जि. सातारा, लखन महादेव कांबळे रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली, महीपती अलदर रा. सांगली, आत्माराम नामदेव साबळे रा.नागज जि. सांगली, अरविंद जाधव रा. कोगनाई ता. कवठे महंकाळ जि. सांगली, अनिल वाघमारे रा.बनपुरी ता. आटपाडी जि. सांगली, धनाजी पंडीत चव्हाण रा. आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली, जयपाल छगन सरवदे रा. नागज ता. कवठे महंकाळ जि. सांगली यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोळा ता. सांगोला येथील अंकुश आलदर यांच्या शेतात अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहा. पोलीस अधिक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूरचे प्रशांत डगळे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यापोसई नितीन जगताप, पोसई महादेव पिसाळ, पोसई अब्दुलहमीद शेख, सपोफौ पांडूरंग ढवळे, पोह रोंगे, पोह गोविंद कामतकर, पोहेकॉ महेश कांबळे, पोकॉ विनोद शिंदे, पोकॉ सोमनाथ माने, पोकॉ वैभव घायाळ, पोकॉ महेश गोडसे, पोह रमेश जाधव, पोह राजू घोडके, पोह चेतन पाटील, पोहेकॉ देवकते, पोना सोमनाथ नरळे, पोकॉ देवेंद्र सुर्यवंशी, पोहेकॉ सुहास देशमुख, पोह प्रमोद साळुंखे, पोह शिंदे, पोहेकॉ गरड, पोह इरपान शेख, पोह सचिन आटपाडकर, पोना बाजीराव काकडे, पोना सज्जन भोसले, पोकॉ सागर गवळी, पोहेकॉ राजाराम चौगुले, पोकॉ पांडूरंग टिंगरे यांनी अंकुश आनंदा आलदर रा. कोळा ता. सांगोला विनापरवाना जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी ४५ जण वेगवेगळ्या टेबलवरती मन्ना, तीनपती (तिरट), अंदरबाहर नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलीसांची चाहुल लागताच जुगार खोलीमध्ये उपस्थित असलेले इसम इकडे तिकडे पळून जाण्याचा प्रयत्न करून लागले. सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३७ मोबाईल, १४ दुचाकी, ११ चारचाकी व रोख रक्कम असा १ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई दरम्यान पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेतले. तर विकास प्रकाश बंडगर रा.जत जि.सांगली, कश्ष्णा रावसाहेब घोरपडे रा. शिवनी ता. कडेगाव जि. सांगली, जयप्रकाश शंकर खुबीकर रा.उचगाव जि. कोल्हापूर, दगडू नारायण गोडसे रा.सोलापूर, अजित पाटोळे रा. मायनी ता. खटाव जि. सातारा, लखन महादेव कांबळे रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली, महीपती अलदर रा. सांगली, आत्माराम नामदेव साबळे रा.नागज जि. सांगली, अरविंद जाधव रा. कोगनाई ता. कवठे महंकाळ जि. सांगली, अनिल वाघमारे रा.बनपुरी ता. आटपाडी जि. सांगली, धनाजी पंडीत चव्हाण रा. आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली, जयपाल छगन सरवदे रा. नागज ता. कवठे महंकाळ जि. सांगली हे पळून जाण्यात यशस्वी झाले.

सांगोला तालुक्यातील कोळा गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालत असताना ही गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना मिळाली, परंतु स्थानिक पोलिसांना याची कोणतीही कुणकुण लागली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!